सोलापूर शहर हे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्याच्या सरह्दी नजीक वसलेले शहर आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, दळणवळणाच्या सोयी, व्यापार यामुळे सोलापूर शहराचा विकास सातत्याने होत आहे. सोलापूर शहरात पूर्वी भुसार शेतीमालाचा व्यापार जोडभावी पेठ, मीठ गल्ली या ठिकाणी होत असे व फळे भाजीपाला या शेतीमालाचा व्यापार कस्तुरबा मंडई,राणी लक्ष्मीबाई मंडई या ठिकाणी होत असे तसेच जनावरांचा बाजार कन्ना चौक व कडबा बाजार बाळीवेस, बंधनवेस, मार्कन्डेय मंदीर या ठिकाणी भरत असे या ठिकाणची जागा रहदारीच्या ठिकाणी होती. या ठिकाणची जागा शेतकरी व व्यापारी यांना व्यवहाराच्या दृष्टीने गैरसोयीची व अपुरी होती . सर्व नियंत्रित शेतीमालाचे व्यवहार एकाच ठिकाणी व्हावेत, शेतीमालाची साठवणूक, विक्री व वितरणाची व्यवस्था सुलभरीत्या व्हावी, मालाची नासधूस होऊ नये यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीने अद्यावत असे मुख्य बाजार आवार निर्माण करणेसाठी मा. डेप्युटी कलेक्टर सोलापूर यांचेकडील जा.क्र. एलएक्यू/३२/८२ दिनांक २८/३/१९६७ च्या फायनल अॅवार्ड प्रमाणे सोलापूर हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील १०५ एकर ३० गुंठे ६/५० यार्ड इतकी जमीन संपादन केली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
| अ.नं. | टी. पी.नं. व फा. प्लॉट नंबर | एकर | गुंठे | यार्ड | कब्जात मिळालेली तारीख |
|---|---|---|---|---|---|
| १ | टी.पी. १ फा. प्लॉट नं. ७ अ | ४२ | २३ | ६/५० | दिनांक ५/६/१९६७ |
| २ | टी.पी. १ फा. प्लॉट नं. ८ | २८ | oo | oo | दिनांक ३१/१०/१९६७ |
| ३ | टी.पी. १ फा. प्लॉट नं. ६/३३ | oo | ०३ | oo | दिनांक ३१/१०/१९६७ |
| ४ | टी.पी. १ फा. प्लॉट नं. ६/३४ | oo | ०४ | oo | दिनांक ३१/१०/१९६७ |
| ५ | टी.पी.२ फा. प्लॉट नं. ९७ | ३५ | oo | oo | दिनांक ३१/१०/१९६७ |
वरील पैकी टि.पी. २ फा. प्लॉट नं. ९७ मधील ४ एकर ९ गुंठे इतकी जमीन शासनाने दिनांक ३०/९/१९७१ च्या अॅवार्ड प्रमाणे नॅशनल हायवे डायव्हर्शनसाठी घेतली आहे.सध्या बाजार समितीकडे १०१ एकर २१ गुंठे इतकी मुख्य बाजार आवाराची जागा आहे. .त्यापैकी प्रक्रिया विभागातील ४०२६.५ चौ.मि.इतकी जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र.९ च्या चौपदरी करणे रस्त्यासाठी इतकी जमीन संपादीत केली आहे. तसेच मौजे दोड्डी ता.द. सोलापूर जिल्हा सोलापूर येथे गट नं २०८/२ ब ची जागा २ हेक्टर ८१ आर इतकी घेतली असुन त्यात बाजार समितीच्या पुढील व्यवस्था सुलभरीत्या व्हावी, त्या मध्ये गोडावून, कोल्ड स्टोरेज, प्रिकुलिंग त्याचे नियोजन करण्यात आले आहे. वरीलपैकी ९ आर. इतकी जमीन नॅशनल हायवेने संपादन केली आहे.
मुख्य बाजार आवारासाठी संपादीत केलेली जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री मा.ना. वसंतराव नाईक यांचे शुभहस्ते दिनांक २०/३/१९६९ रोजी मुख्य बाजार आवाराचे श्री. सिध्देश्वर बाजारपेठ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर सदर जागेत विकसनाची व बांधकामाची कामे हाती घेण्यात आली ज्याप्रमाणे विकसनाची कामे पूर्ण झाली त्याप्रमाणे शहरातील निरनिराळ्या शेतीमालाच्या बाजारपेठेचे स्थलांतर श्री. सिध्देश्वर बाजारपेठ या मुख्य बाजार आवारात करण्यात आले. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
| अ.नं. | शेतीमालाची बाजारपेठ | पूर्वीच्या बाजाराचे ठिकाण | श्री. सिध्देश्वर बाजारपेठेत स्थलांतर केल्याची तारीख |
|---|---|---|---|
| १ | जनावर बाजार | कन्ना चौक | दिनांक १०/६/१९६९ |
| २ | कडबा बाजार | बाळीवेस, बंधनवेस, मार्कडेय मंदिर | दिनांक १/६/१९७२ |
| ३ | भुसार बाजार | जोडभावी पेठ, मीठ गल्ली | दिनांक १०/५/१९७८ |
| ४ | फळे व भाजीपाला बाजार | कस्तुरबा मंडई व लक्ष्मी मंडई | दिनांक २९/६/१९८७ |
सध्या सर्व नियंत्रित शेतीमालाचे खरेदी - विक्रीचे व्यवहार श्री. सिध्देश्वर बाजारपेठ, हैद्राबाद रोड, सोलापूर या मुख्य बाजार आवारात होतात.
